úä
पापांची
वासना
नको
दांवू
डोळा
चले
जाव,
करेंगे
या
मरेंगे,
हे
राम...
अशा
साधासुध्या
शब्दांना
वेदमंत्रांहून
मोठं
प्रामाण्य
भारतवर्षात
मिळालं.
कारण
त्यामागे
मोहनदास
करमचंद
गांधी
या
साध्यासुध्या
दिसणाऱया
महापुरुषाच्या
संतपणाचं
सामर्थ्य
होतं.
हे
संतपण
आलं
होतं
ते
खरयाच्या
प्रयोगातून
आणि
संस्कारातून.
देशोदेशींचे,
पिढ्यानपिढ्यांचे
संस्कार
रिचवून
असं
सामर्थ्य
उभं
राहतं.
त्यात
एक
संस्कार
मराठी
माती
घडवणाऱ्या
तुकाराम
महाराजांचाही
होता.
आपल्या
मराठी
मनांवर
कळत
नकळत
असा
संस्कार
होत
असतो.
पण
रिचवण्या
आणि
पचवण्याआधीच
तो
संस्कार
कापरासारखा
उडून
जातो.
मात्र
गांधीजींनी
तुकोबारायाचे
संस्कार
कसे
पचवले
होते,
ते
समजून
घेण्याचा
सोपा
मार्ग
आहे.
गांधीजींनी
तुकोबांच्या
सोळा
अभंगांचे
भाषांतर
वाचण्याचा.
गांधीजींच्या
भाषांतरात
साहेबाचा
भाषेचा,
त्या
भाषेच्या
संपूर्णपणे
वेगळ्या
पार्श्वभूमीचा
कोणताही
अडथळा
न
होता
तुकोबांचे
विचार
जसेच्या
तसे
वाचकांपर्यंत
पोहचतात.
लेखक
आणि
भाषांतरकारातलं
असं
अद्वैत
क्वचितच
अनुभवायला
मिळतं.
दोन
सच्च्या
वैष्णवांमधलं
हे
अद्वैत.
विशेष
म्हणजे
गांधीजींनी
मराठी
मातीत
बसून
हे
लिहिलंय.
हे
भाषांतर
त्यांनी
येरवडा
तुरुंगात
म्हणजे
त्यांच्या
शब्दांत
येरवडा
आश्रमात
बंदी
असताना
केलंय.
त्यांच्या
सगळ्या
सोळा
अभंगाचं
भाषांतर
आता
एकामागून
एक
रोज
देणार
आहोत.
त्यानंतर
संतपरंपरेतल्या
आणखी
काही
अभंगांची
भाषंतरे
आम्ही
वारी
संपेपर्यंत
सादर
करणार
आहोत.
आज
त्यातला
पहिला
अभंग
गाधीजींचा
सर्वाधिक
आवडता
अभंग.
भाषांतराची
तारीख
आहे,
१६
ऑक्टोबर.
आपल्या
मुलाला
लिहिलेल्या
पत्रांत
त्यांनी
या
अभंगाचा
उल्लेख
केला
आहे.
त्यांना
या
अभंगांमध्ये
आपली
तीन
माकडे
दिसत
असत...
पापांची
वासना
नको
दांवू
डोळा
l त्याहुनि
आंधळा
बराच
मी ll
निंदेचे
श्रवण
नको
माझे
कानी
l बधिर
करोनि
ठेवी
देवा
ll
अपवित्र
वाणी
नको
माझ्या
मुखा
l त्याजहुनि
मुका
बराच
मी ll
नको
मज
कधी
परस्त्रिसंगती
l जनांतुन
मातीं
उठता
भली
ll
तुका
म्हणे
मज
अवघ्याचा
कंटाळा
l तू
एक
गोपाळा
आवडसी
ll
O God,
let me not be witness to desire for sin, better make me
blind;
Let me
not hear ill of anyone, better make me deaf;
Let not
a sinful word escape my lips, better make me dumb;
Let me
not lust after another's wife, better that I disappear
from this earth.
Tuka
says: I am tired of everything worldly, Thee alone I
like, O Gopal.
संत
नामदेवांनी
भागवतधर्माची
पताका
अटकेपार
लावली.
संपूर्ण
भारतभर
त्यांनी
पांडुरंगाच्या
भक्तीची
मोहर
उमटवली.
गुजरातही
त्याला
अपवाद
नव्हता.
गुजराततेतल्या
वैष्णव
संतावंर
नामदेवांचा
प्रभाव
स्पष्ट
आहे.
सर्वात
प्रसिद्ध
गुजराती
संतकवी
नरसी
मेहतांच्या
काव्यात
तर
नामदेवांचा
उल्लेख
अनेकदा
येतो.
ज्याने
नामदेवासाठी
दूधभात
खाल्ला.
ज्याने
नामदेवासाठी
मंदिर
फिरवले
असे
भगंवताचे
वर्णन
त्यांनी
केले
आहे.
नरसी
मेहतांच्या
भक्तिकाव्याने
सबंध
गुजरातेवर
प्रभाव
टाकलाय.
धामिर्क
वैष्णव
कुटुंबात
जन्मलेल्या
गांधीजींवरही
त्याचा
प्रभाव
होता.
विशेषत:
नरसींच्या
'वैष्णव
जन
तो...'ने
तर
त्यांच्यावर
लहानपणापासून
गारूड
केलं
होतं.
गांधीजींचा
ध्यास
नरसींनी
वर्णन
केलेला
खरा
वैष्णव
बनण्याचाच
होता.
त्यामुळे
गांधीजींनी
तुकाराम
गाथा
हाती
घेतली
असेल
तेव्हा
त्यांना
'जे
का
रंजले
गांजले'
हा
अभंग
सर्वात
आधी
आपला
वाटला
असावा.
गांधीजींनी
आपल्या
अनुवादातही
सर्वात
वरचे
स्थान
याच
अभंगाला
दिले
आहे.
शाळेतल्या
निबंधपासून
प्रमुख
पाहुण्याच्या
वापरून
गुळगुळीत
झाला
असला
तरी
पुन्हा
एकदा
मूळातून
वाचायला
हवा.
'आपल्या
नोकरचाकरांवर
मूलासारख
पेम
करणारा
तोच
खरा
साधू'
अशी
रोकडी
व्याख्या
त्यात
आहे.
आनंदाची
गोष्ट
ही
इथे
ही
व्याख्या
आणि
त्याचा
अनुवाद
हे
शब्दांचे
बुडबुडे
नाहीत.
दोन्ही
महात्म्यांनी
हे
शब्द
आपल्या
जीवनात
उतरवून
दाखविलेत.
जे
का
रंजले
गांजले
।
त्यासि
म्हणे
जो
आपले
।।
१।।
तोची
साधू
ओळखावा
।।
देव
तेथे
चि
जाणावा
।।धृ.।।
मृदू
सबाह
नवनीत
।
तैसे
सज्जनाचे
चित्त
।।
२।।
ज्यासि
अंपगिता
नाही
।
त्यासि
घरी
जो
हृदयी
।।
३।।
दया
करणे
जे
पुत्रासी
।
ते
चि
दासा
आणि
दासी
।।
४।।
तुका
म्हणे
सांगू
किती
।
तो
चि
भगवंताची
मूर्ती
।।
५।।
Know him
to be a true man who takes to his bosom those who are in
distress. Know that God resides in the heart of such a
one. His heart is saturated with gentleness through and
through. He receives as his only those who are forsaken.
He bestows on his man servants and maid servants the
same affection he shows to his children. Tukaram says:
What need is there to describe him further? He is the
very incarnation of divinity..
महाराच्या
सिवे...
गांधीजी
आणि
आंबेडकर
या
दोन्ही
महापुरुषांचा
प्रवास
एकाच
दिशेने
पण
समांतर
झाला.
आंबेडकरवाद्यांनी
गांधीजींना
समजून
घेतले
नाही
आणि
गांधीवाद्यांनी
आंबेडकरांना.
दोघांचा
वारसा
सांगणाऱ्या
पुढाऱ्यांनी
या
दोघांना
एकत्र
आणलं
ते
फक्त
राजकीय
फायद्यासाठी.
अन्यथा
या
दोन्ही
विचारधारा
जवळही
येऊ
नयेत
म्हणून
डोळ्यात
तेल
घालून
प्रयत्न
केले.
असे
कितीही
प्रयत्न
केले
असले,
तरी
अनेक
बाबतीत
गांधी
आणि
आंबेडकर
एकमेकांची
गळाभेट
अनेकदा
झालीय.
तुकाराम
त्यातली
एक
गोष्ट.
स्वत:ला
'यातिहीन'
म्हणणारा
आणि
विदोहाची
पताका
उंचावणारा
तुकाराम
आंबेडकरांना
आपलासा
वाटलाच.
पण
तितकाच
'विष्णुदास'
असणारा
आणि
पदोपदी
संतसंग
मागणारा
तुकाराम
गांधीजींना
आवडणे
तितकेच
स्वाभाविक
होते.
आपण
दोघांच्याही
पूर्वपरंपरेत
शोभून
दिसणारा
तुकाराम
समजून
घेऊया.
एकदा
ते
झाले
की
गांधी
आणि
आंबेडकर
दोघेही
आरशासारखे
समोर
दिसू
लागतील.
महारासि
सिवे।
कोपे
ब्राम्हण
तो
नव्हे।।
तया
प्रायश्चित्त
कांही।
देहत्याग
करितां
नाही।।
नातळे
चांडाळ।
त्याचा
अंतरी
विटाळ।।
ज्याचा
संग
चित्ती।
तुका
म्हणे
तो
त्या
याती।।
He who
becomes enraged at the touch of a Mahar is no Brahmin.
There is
no penance for him even by giving his life.
There is
the taint of untouchability in him who will not touch a
Chandal.
Tuka
says: A man becomes what he is continually thinking of.
नाहीं
संतपण
मिळतें
हें
हाटीं...
नंतरच्या
काळात
सर्वोदयींचे
आश्रमातल्या
प्रार्थना,
भजन
हे
सारे
माणसं
घडवण्याचेच
प्रयोग
होते.
स्वत:
मोहनदासाचा
महात्मा
बनण्याचा
प्रवासही
अशाच
प्रयोगांचा
होता.
प्रयोग,
सत्याचे
प्रयोग.
साधन
स्वत:,
साधक
स्वत:
आणि
साध्यही
स्वत:चंच.
तुकारामही
असेच
आतआत
डोकावत
सत्यापर्यंत
पोहोचलेले.
भगवंताच्या
भेटीसाठी
स्वत:च
धावायचं,
स्वत:च
पडायचं,
स्वत:च
स्वत:ला
हुरूप
द्यायचा
आणि
स्वत:च
स्वत:ला
घडवायचं.
तुकारामांचा
कोणी
गुरु
नाही.
गांधीजींचही
तसंच.
त्यांनी
अनेकांचा
गुरु
म्हणून
उल्लेख
केला,
पण
फुलटाइम
गुरु
त्यांनाही
नव्हता.
तसं
पाहिलं,
तर
सद्विचार
हेच
या
दोघांचे
मार्गदर्शक
होते.
हे
विचार
जीवनात
उतरवण्यासाठी
दोघांनीही
आटापिटा
केला.
विचार
जीवनात
उतरविणं
हेच
ज्ञान
असतं.
सॉक्रेटिस
याविषयी
ठाम
सांगतो
, virtue is knowledge.
असे
विविध
सद्विचार
गांधीजींनी
आश्रम
भजनमाला
मध्ये
एकत्र
आणले
आहेत.
आजचा
अभंग
संतपणाबद्दलचा.
नाहीं
संतपण
मिळतें
हें
हाटीं।
हिंडतां
कपाटीं
रानींवनीं
।।
नये
मोल
देतां
राशी
।
नाहीं
तंे
आकाशींपातळीं
तें।।
तुका
म्हणे
मिळे
जिवाचियें
साठीं
।
नाहीं
तरीं
गोष्टी
बोलों
नये
।।
Saintliness is not to be purchased in shops nor is it to
be had for wandering nor in cupboards nor in deserts nor
in forests. It is not obtainable for a heap of riches.
It is not in the heavens above nor in the entrails of
the earth below. Tuka says: It is a life’s bargain and
if you will not give your life to possess it better be
silent. 24-10-1930
पवित्र
तें
कुळ
पावन
तो
देश
पावन
देश
कोणता,
तुकाराम
महाराज
म्हणतात,
जेथे
हरिचे
दास
जन्म
घेतात
तो.
त्या
अर्थाने
महाराष्ट्र
आणि
सौराष्ट्र
हे
दोन्ही
प्रदेश
अती
पावन.
संतांची
मांदियाळी
दोन्हीकडे
बहरली.
गांधीजी
सौराष्ट्रातलेच.
दुदैर्व
हे
की
सौराष्ट्रातली
जातीची
उतरंड
अजूनही
पूर्णपणे
ढळलेली
नाही.
तुकारामांनंतर
शंभर
वर्षांतच
देहू
ते
पंढरीच्या
वाटेत
असणाऱ्या
पुण्यात
अस्पृश्यांना
थुंकण्यासाठी
गळ्यात
गाडगी
बांधावी
लागली.
पण
म्हणून
भागवत
धर्माने
केलेल्या
क्रांतीचं
महत्त्व
कमी
होत
नाही.
महाराष्ट्रात
अशी
एकही
जात
नव्हती
ज्यात
त्याकाळी
एकही
संत
झाला
नाही.
तुकोबांनी
आपल्या
अभंगात
या
संतांची
जातवार
यादीच
दिली
आहे.
हा
एक
सामाजिक
दस्तावेजच
आहे.
ज्ञानदेवे
रचिला
पाया...
तुका
झालासे
कळस
या
बहिणाबाईंच्या
अभंगा
इतकाच
मोलाचा.भारतीय
इतिहासातील
एका
मोठ्या
सामाजिक
क्रांतीचा
हा
सज्जड
पुरावा
आहे.
गांधीजींनी
अनुवादासाठी
हा
अभंग
निवडला
नसता
तरच
नवल.
त्यांनी
उभ्या
केलेल्या
स्वातंत्र्य
संगरातही
अशीच
समाजाच्या
प्रत्येक
घटकांत
त्यांना
जागृती
अपेक्षित
होती.
काही
प्रमाणात
ती
सफलही
झाली.
दोन्ही
क्रांत्या
अस्सल
भारतीय
मातीतल्या
होत्या.
दोन्ही
तत्त्वज्ञानांचं
अधिष्ठान
भक्ती
होतं.
परिभाषा
ही
आध्यात्मिक
होती,
भारतीयांच्या
मनात
रूजलेली.
त्यामुळेच
वेदांचा
हवाला
देत
जाती-धर्म
नाकारण्यात
विरोधाभास
उरला
नाही...
पवित्र
तें
कुळ
पावन
तो
देश।
जेथें
हरिचे
दास
घेती
जन्म।।
कर्मधर्म
त्याचे
जाला
नारायण ।
त्याचेनी
पावन
तिन्ही
लोक।।
वर्णअभिमानें
कोण
जाले
पावन ।
ऐसें
द्या
सांगून
मजपाशीं।।
अंत्यजादि
योनि
तरल्या
हरिभजनें ।
तयाचीं
पुराणें
भाट
जालीं।।
वैश्य
तुळाधार
गोरा
कुंभार ।
धागा
हा
चांभार
रोहिदास
।।
कबीर
मोमीन
लतिब
मुसलमान।
शेणा
न्हवी
जाण
विष्णूदास।।
काणोपात्र
खोदु
पिंजारी
तो
दादु।
भजनीं
अभेदू
हरिचे
पायीं।।
चोखामेळा
बंका
जातीचा
माहार ।
त्यासी
सवेर्श्वर
ऐक्य
करी
।।
नामयाची
जनी
कोण
तिच
भाव ।
जेवी
पंढरीराव
तियेसवें।।
मैराळ
जनक
कोण
कुळ
त्याचें ।
महिमान
तयाचें
काय
सांगों।।
यातायातीधर्म
नाहीं
विष्णूदासा ।
निर्णय
हा
ऐसा
हा
वेदशास्त्रीं।।
तुका
म्हणे
तुम्ही
विचारावे
ग्रंथ।
तारिले
पतित
नेणों
किती।।
Blessed
is that family and that country where servants of God
take birth. God becomes their work and their religion.
The three worlds become holy through them. Tell me who
have become purified through pride of birth? The Puranas
have testified like bards without reserve that those
called untouchables have attained salvation through
devotion to God. Tuladhar, the Vaishya, Gora, the
potter, Rohidas, a tanner, Kabir, a Momin, Latif, a
Muslim, Sena, a barber, and Vishnudas, Kanhopatra, Dadu,
a carder, all become one at the feet of God in the
company of hymn singers. Chokhamela and Banka, both
Mahars by birth, became one with God. Oh, how great was
the devotion of Jani the servant girl of Namdev!
Pandharinath (God) dined with her. Meral Janak’s family
no one knows, yet who can do justice to his greatness?
For the servant of God there is no caste, no varna, so
say the Vedic sages. Tuka says: I cannot count the
degraded.
विठोबासी
शरण
जावे
नामजपाला
भारतीय
अध्यात्म
आणि
तत्त्वज्ञानात
मोठी
जागा
मिळाली
आहे.
भगवत्भक्तीच्या
या
पहिल्या
पायरीबद्दल
संतसाहित्यात
सर्वाधिक
लिहिले
गेलंयं.
विशेष
म्हणजे
सामाजिक
दृष्टी
असलेल्या
संतांनी
आणि
वेदांताचा
पुरस्कार
करणाऱ्या
नव्याजुन्या
तत्त्ववेत्त्यांनीही
नामजपला
प्राधान्य
दिले
आहे.
तुकाराम
महाराजांनी
अनेक
अभंगांमध्ये
याच
नामजपाचं
महात्म्य
गायले
आहे.
आजचा
अभंगही
त्यातलाच
एक.
हा
अभंग
सांगतो,
विठोबाला
शरण
जाणं
आणि
त्याच्या
नामाचा
जप
करणं
हेच
सगळ्या
ज्ञानाचे
सार
आहे.
मात्र
लोक
यापैकी
पहिला
भाग
सोडून
केवळ
दुसरा
दर्शनी
सोपा
वाटणारा
नामजपाचाच
मार्ग
उचलतात.
त्यामुळे
देवाचिये
द्वारी
क्षणभरच
काय
तासंतास
उभं
राहूनही
अधीर्मुर्धी
मुक्तीही
मिळत
नाही.
गांधीजींनी
अनेकदा
रामनामाचा
महिमा
सांगितला
आहे.
त्यांच्या
या
श्रद्धेविषयीचे
काही
प्